आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियाबरोबर भांडला आदित्य पांचोली, बघा जियाच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जिया खानवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्ययात्रेत कुटुंबीय, मित्र आणि बॉलिवूडमधील कलाकार सहभागी झाले होते. सांताक्रूजमधील दफनभूमीत जियावर अंत्यसंस्कार पार पडले.
जियाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर तिच्या आईचे सांत्वन करण्यासाठी आमिर खान, रितेश देशमुख, नगमा, उर्वशी ढोलकिया आणि सिद्धार्थ माल्यासमवेत अनेक मंडळी पोहोचली होती.
जियाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जाताना आदित्य पांचोलीची मीडियाशी बाचाबाची झाली. यावेळी मीडियाच्या ट्रायपॉडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर आपला राग काढला.
पोलिसांनी मंगळवारी आदित्य पांचोली आणि त्याचा मुलगा सुरज पांचोलीची जियाच्या आत्महत्येप्रकरणी बराच वेळ चौकशी केली होती.
बघा जियाच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...