आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता@84: वाचा, \'स्‍वर सम्राज्ञी\'चे लांब केस आणि B\'Day साजरा न करण्याचे रहस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज लता मंगेशकर यांचा 84 वा वाढदिवस आहे. त्यांना स्वर कोकिळा, स्वर सम्राज्ञी या उपाधींनी ओळखले जाते. लता दीदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी अनिल राही यांनी त्यांच्याशी खास बातचित केली. या मुलाखतीत लता दीदींनी त्यांची जीवनशैली, समाजसेवा, साहित्याविषयी असलेली आवड, यासह अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या...

लता दीदी म्हणतात...

आजच्या पिढीच्या तरुणींमध्ये लांब केसाबद्दल विशेष आकर्षण बघायला मिळतं. मी सांगू इच्छिते, की लांब केसासाठी मी कधीही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. शॅम्पू किंवा केस लांब करणारे तेल वैगेर गोष्टी मी वापरत नाही. फक्त बालपणापासून मी कधी केस कापले नाहीत. मुन्शी प्रेमचंद यांच्या लिखाणाची मी चाहती आहे. त्यांचे लिखाण वाचूनच मी हिंदी शिकले. अनेकदा मी कविता-कथा लिहिण्याचा प्रयत्न केला, मात्र मला ते जमले नाही.

आता संगीत कानासाठी नव्हे तर डोळ्यांसाठी तयार केले जाते. रेकॉर्डिंगच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा झाली आहे. मात्र गाण्यांमधला जीव हरपला आहे.

वाढदिवस साजरा करत नाही, कारण...

आयुष्यातील एक वर्ष कमी झाले, हा अनुभव चांगला वाटत नाही. त्यामुळे मी वाढदिवस साजरा करत नाही. मात्र बालपणी वाढदिवसाविषयी मला प्रचंड उत्सुकता असायची. आता वाढदिवशीसुद्धा अगदी रोजप्रमाणेच दिनचर्या असते.

देवाची कृपा...

ब-याच संघर्षानंतर आयुष्यात चांगले दिवस बघायला मिळाले. मला कोणताही दुर्धर आजार झाला नाही, यासाठी मी देवाचे आभार मानते.

आता जास्त वाचन करते...

या काळात मी वाचनावर विशेष भर देत आहे. मैथिली शरण गुप्त, डॉ. जयशंकर प्रसाद, डॉ. हरिवंशराय बच्चन, पं. नरेंद्र शर्मा या कवी-लेखकांची जवळपास सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. पं. नरेंद्र शर्मा यांना मी 'पिताजी' म्हणायचे. त्यांची अनेक गाणी मी गायली आहेत. यामध्ये 'ज्योति कलश छलके...' आणि 'सत्यम् शिवम् सुंदरम्...' ही माझी आवडती गाणी आहेत.

फाइन आर्ट आहे पसंत...

मला पेंटिंगची आवड आहे. माझी बहीण उषा खूप चांगली पेंटर आहे. तिच्याकडून मी ही कला शिकले. एकदा माझे भाऊ हृदयनाथ यांनी माझ्या बहिणीच्या पेंटिंगचे एक्झिबिशन भरवले होते, तेव्हा माझ्या काही पेंटिग्स तिथे ठेवण्यात आल्या होत्या. मला स्वतःला फाइन आर्ट पसंत आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत गात राहणार...

मी गाणे बंद केलेले नाही. मी आता स्वतःसाठी गाते. गेल्या वर्षी मी 'एलएम स्टुडिओ' नावाने रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि 'एलएम म्युझिक' या नावाने म्युझिक कंपनी सुरु केली. माझ्या स्वतःच्या कंपनीअंतर्गत मी मराठी भक्ति गीतांचा एक अल्बम रिलीज केला. सध्या माझे सिखों की गुरबानी, जैन धर्मातील भक्ति गीत आणि बंगाली देवीच्या भक्ति गीतांवर काम सुरु आहे. कृष्ण भक्तिच्या गीतांचा अल्बम रिलीजसाठी तयार आहे. या अल्बममध्ये रवींद्र जैन यांच्या गीतांना मयुरेश पैने संगीत दिले आहे. सुफी गाण्यांच्या अल्बमवरसुद्धा काम सुरु आहे. या अल्बममधील दोन गाणीसुद्धा रेकॉर्ड झाली आहेत. मला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत गात राहायचे आहे.

सहा दशकांपेक्षा जास्त आपल्या आवाजाने लाखो-करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणा-या लता दीदींच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...