आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lata Mangeshkar Sang Song 'A Mere Vatan Ke Loga' Completed 50 Years

असे आकाराला आले होते 'ऐ मेरे वतन के लोगो...' हे गीत, जाणून घ्या या गीताचा इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लता मंगेशकर यांनी गायलेले प्रसिध्द गीत 'ए मेरे वतन के लोगो'चा सुवर्ण जयंती समारंभ 27 जानेवारीला मुंबईमध्ये साजरा करण्यात आला. कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेले हे गीत लता मंगेशकर यांनी 27 जानेवारी 1963मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर सर्वप्रथम गायले होते. परंतु हे गीत कसे तयार झाले, याविषयीचा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे. 1990च्या दशकात बीबीसीला दिलेल्या एका खास मुलाखतीत स्वत: कवी प्रदीप यांनी हे गीत कसे आकाराला आले, याविषयी सांगितले होते.
''1962च्या भारत-चीन युध्दात भारत अपयशी ठरला होता. सर्व देशाचे मनोबळ ढासळले होते. त्यावेळी सर्वांच्या नजरा फिल्मी दुनियेकडे होत्या. कारण कलाकार, कवी हेच त्यावेळी सर्वांना उत्साह आणि प्रोत्साहन देऊ शकत होते. सरकारकडूनही फिल्मी जगातील लोकांना सांगितले जाऊ लागले, की तुम्हीच सर्वांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकता. अशी काही गाणी तयार करा, की त्यातून सर्व जगाचे मनोबल वाढेल. मला वाटलेच होते, की हे काम फुकटच करावे लागणार. म्हणून मी त्यातून पळ काढत होतो, परंतु किती दिवस असे करणार. शेवटी मी त्यांच्या मुठीत सापडलो. कारण मी त्यापूर्वीसुध्दा देशभक्तीवर गाणी लिहिली होती. म्हणून मला असेच एखादे गाणे लिहण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी तीन आवाज सर्वाधिक प्रसिध्द होते, मोहम्मद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर. त्याच दरम्यान नौशाद भाई यांनी मोहम्मद यांच्याकडून 'अपनी आजादी को हम हर्गिज मिटा सकते नही' हे गाणे गाऊन घेतले. हे गीत नंतर 'लीडर' सिनेमात वापरले गेले. मुकेश यांच्याकडून 'जिस देश मे गंगा बहती है' हे गीत गाऊन घेतले होते. अशाप्रकारे रफी आणि मुकेश त्यावेळी व्यस्त झाले होते. आता फक्त राहिल्या होत्या लता मंगेशकर. मी एक भावनात्मक गाणे लिहिण्याचा विचार केला. अशाप्रकारे 'ऐ मेरे वतन के लोगो' या गाण्याने जन्म घेतला. हे गीत लता यांनी सर्वप्रथम पंडित नेहरूंसमोर गायले. हे गीत ऐकून त्यांचे डोळे पाणावले होते.''
1952मध्ये आलेल्या 'जागृती' सिनेमामधील कवी प्रदीप यांचे 'दे दी हमे आजादी बिना खडक बिना ढाल' हे गीतसुध्दा खूप प्रसिध्द झाले होते. हे गीत महात्मा गांधी यांना समर्पित करण्यात आले होते. कवी प्रदीप यांनी बीबीसीला सांगितले होते, 'हे गीत माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना खूप आवडले होते. त्यांनी हे गीत माझ्याकडून अनेकदा ऐकले होते.''
कवी प्रदीप यांनी या मुलाखतीत सांगितले होते, की ते एक शिक्षक होते आणि कवितासुध्दा लिहित होते. एकदा त्यांना कामानिममित्त मुंबईला जायचे होते आणि तिथे त्यांनी एका कवी संम्मेलनात सहभाग घेतला. तिथे एक व्यक्ती हजर होती. ती व्यक्ती बॉम्बे टॉकिजमध्ये कामाला होती. त्यांना त्यांची कविता खूप आवडली आणि त्यांनी ती कविता बॉम्बे टॉकिजचे मालक हिमांशु राय यांना ऐकवली. त्यांनी ताबडतोब कवी प्रदीप यांना बोलावले आणि काहीतरी ऐकवण्यास सांगितले. हिमांशु राय यांना माझी त्यांची खूप आवडली आणि त्यांनी प्रदीप यांना लगेच 200 रुपये प्रति महिन्याच्या पगारावर नोकरी दिली. 200 रुपये त्यावेळी खूप मोठी रक्कम असल्याचे प्रदीप म्हणाले होते.
या मुलाखतीत कवी प्रदीप यांनी सांगितले होते, की त्यांना 90च्या दशकातील संगीत आवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी गीत लिहणे बंद केले होते. 1998मध्ये कवी प्रदीप यांचे निधन झाले.