आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Late Actress Divya Bharti's Cousin Sister Kainaat Arora Makes Her Bollywood Debut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची ही बहीण करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री दिव्या भारतीने वयाच्या केवळ 19व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मात्र दिव्या भारतीचा अभिनय आणि चेहरा आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. दिव्या भारतीने आपल्या करिअरची सुरुवात तामिळ आणि तेलगू सिनेमांमधून केली होती. 'विश्वात्मा' या सिनेमाद्वारे तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमातील 'सात समुंदपार...' हे गाणे बरेच गाजले होते आणि दिव्याला या सिनेमामुळेच बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती. शोला और शबनम, दीवाना हे सिनेमेसुद्धा दिव्याच्या करिअरमधील हिट सिनेमे होते.

आता दिव्याची बहीण कायनात अरोडा बॉलिवूडमध्ये यश मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. 'ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमाद्वारे दिव्याची ही बहीण मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तसे पाहता 2010मध्ये अक्षय कुमारच्या 'खट्टा-मीठा' या सिनेमात कायनात आयटम नंबरमध्ये दिसली होती. मल्याळम सिनेमातील गाण्यातही कायनात झळकली आहे. मात्र आता अभिनेत्रीच्या रुपात कायनात आपले करिअर सुरु करत आहे. 'ग्रॅण्ड मस्ती'मध्ये ती विवेक ओबरॉयच्या अपोझिट झळकणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा दिव्याची बहीण कायनात अरोराची खास झलक...