आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Bollywood Hindi News Aamir Khan\'s \'Dhoom 3\' Breaks Records In Pakistan Collection News Till Now

DHOOM-3 ने पाकिस्तानातही केली धूम, \'वॉर\'चाही मोडला रेकॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'धूम 3' ने पाकिस्तानमध्ये सुध्दा रेकॉर्ड तोडला आहे. सिनेमाच्या मिळणा-या यशाकडे बघता पाकिस्तानमध्ये प्रत्येक दिवशी पाच शो प्रदर्शित होत आहेत. कराचीच्या 56 थियटरमध्ये सिनेमाने पहिल्या दिवशी 2 कोटीचा व्यवसाय केला. यापूर्वी पाकिस्तानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करण्याचा विक्रम 'वॉर' सिनेमाने रचला होता. पाकिस्तानमध्ये 'वॉर' सिनेमाने पहिल्या दिवशी अडीच कोटी रुपये कमवले होते.
आमिर खानचचा 'धूम 3'- 'धूम 3'ने रिलीज झाल्यानंतर फक्त तीनच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले. सिनेमा पंडित तरण आदर्शच्या सांगण्यानुसार, या सिनेमाने तीन दिवसांमध्ये 107.61 कोटींचा व्यवसाय करुन 'चेन्नई एक्सप्रेस' चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. यावरून लक्षात येतं, की 'धूम 3' ही तिसरी मालिका 'धूम' आणि 'धूम 2' च्या पुढे निघून गेली आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी यश मिळायला सुरूवात झाली होती. भारतात 36 कोटी तर जगभरात 57 कोटी रुपयांचा व्यवसाय या सिनेमाने केला होता.
पाकिस्तानच्या 'वॉर' सिनेमाने शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस'ला सुध्दा मागं टाकलं होतं. 'चेन्नई एक्सप्रेस'ने पाकिस्तानमध्ये पहिल्या दिवशी 90 लाखांचा व्यवसाय केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर आमिरच्या 'धूम 3' च्या यशाची रहस्य