आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Bollywood Hindi News Silsila Ends: Amitabh Bachchan Greets Rekha In Public

अहो आश्चर्यम् ! तब्बल 33 वर्षांनी बिग बींनी घेतली रेखाची भेट, जयांकडूनही विचारपूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मंगळवारी रात्री स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते. या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने अनेकांना एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. ही घटना म्हणजे अमिताभ बच्चन या कार्यक्रमात रेखाची भेट घेताना दिसले.
अवॉर्ड शोदरम्यान अमिताभ बच्चन स्वत: रेखा यांच्याकडे गेले आणि नमस्ते करुन त्यांचं स्वागत केलं. त्यावर रेखा यांनीही बिग बींना अभिवादन केलं. इतकंच नाही अमिताभ यांची पत्नी जया बच्चन आणि रेखा यांनीही एकमेकींची भेट घेतली. अमिताभ आणि जया यांनी रेखासह छायाचित्रेही काढून घेतली. (या अवॉर्ड सोहळ्याची छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा...)
तब्बल 33 वर्षांनी बिग बी आणि रेखाची ही भेट घडली. आजवर हे दोघेही एकमेकांना टाळताना दिसायचे. मात्र मंगळवारी चित्र काही वेगळेच होते.
अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा पहिल्यांदा 1976 साली सुरु झाली होती. या दोघांनी याचवर्षी दो अंजाने या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. 1981 साली प्रदर्शित झालेला यश चोप्रांचा सिलसिला हा या दोघांचा एकत्र असलेला शेवटचा सिनेमा होता. तेव्हापासून हे दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा अमिताभ रेखाला बघूनसुद्धा तिच्याकडे कानाडोळा करताना दिसायचे.
काही दिवसांपूर्वी एक छायाचित्र समोर आले होते, त्यामध्ये अमिताभ रेखाच्या पुढच्या सीटवर बसले होते. मात्र त्यांच्यात बोलणे झाले नव्हते. फ्लाईटमधील एका प्रवाशाने दोघांचे हे छायाचित्र ट्विटरवर अपलोड केले होते.
अमिताभ आणि रेखा यांनी ईमान-धरम, दो अंजाने, खून-पसीना, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, मिस्‍टर नटवरलाल, सुहाग, राम-बलराम आणि सिलसिला या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते.