आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Amitabh Bachchan And Pepsi Who Is Telling Lie

पेप्सीची जाहिरात सोडल्याविषयी अमिताभ बच्चन खोटे बोलले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली अनेक वर्षे पेप्सी, मिरिंडा लेमन या कोल्ड ड्रिंक्ससाठी प्रचार करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पेप्सीको या कंपनीशी आपले नाते संपुष्टात आणण्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यावतीने कराराचा अवधी संपल्यानंतर त्याला पुढे वाढवता येत नाही. त्यामुळे अमिताभ आणि पेप्सीको यांच्यातील नाते संपुष्टात आले आहे. मात्र याविषयी अमिताभ यांनी काही वेगळेच म्हटले आहे. अमिताभ यांच्या वक्तव्यानंतर, कंपनीच्या अधिका-यांकडून आलेल्या प्रतिक्रियांनी हा प्रश्न उपस्थित झाला आहे, की अखेर खोटं कोण बोलत आहे?
गेल्या आठवड्यात आयआयएम अहमदाबादमध्ये मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना अमिताभ यांनी म्हटले होते, ''जयपूरमध्ये एका शाळेत आयोजित कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने पेप्सीमध्ये विषारी घटक असल्याचे सांगत आपण या ब्रँडची जाहिरात का करता, अशी विचारणा केली. तेव्हापासून मी ही जाहिरात करणे बंद केले.''
अमिताभ बच्चन यांनी पेप्सीमध्ये विषारी घटक असल्याचा उल्लेख केल्यामुळे पेप्सिकोचे अधिकारी विचारात पडले आहेत, की अखेर अमिताभ यांनी असे का म्हटले? पेप्सी ब्रॅण्डच्या प्रवक्त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, की अमिताभ बच्चन लीविंग लीजेंड आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे कंपनीचे कर्मचारी नाराज आहेत. कर्मचारी आपल्या ब्रॅण्ड अॅम्बेसेजरला लीडर म्हणून बघतात.
पेप्सिको कंपनीने आठ वर्षांच्या करारासाठी अमिताभ बच्चन यांना दरवर्षी तीन कोटींचे मानधन दिले. एकुण 24 कोटी रुपये बिग बींना कंपनीच्या वतीने मानधन म्हणून देण्यात आले. 1998 मध्ये पेप्सी आणि अमिताभ यांच्यात करार झाला होता. त्यावेळी कंपनीने त्यांना मिरिंडा लेमनचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. 2002 ते 2005पर्यंत त्यांनी पेप्सी कोलाचा प्रचार केला.
देंत्सु इंडिया ग्रुपचे अध्यक्ष आणि पेप्सी कंपनीतील माजी अकाउंट हेड रोहित ओहरी यांनी सांगितले, ''बच्चन साहेबांनी अनेक वर्षे पेप्सीचा प्रचार केला. विचार करुनच ते कोणत्याही ब्रॅण्डचा प्रचार करतात. त्यामुळे पेप्सीविषयी त्यांच्या मनात जे विचार आहेत, ते ऐकुन मी हैराण झालो आहे.''
पुढे पाहा, पेप्सीच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन...