आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Krrish 3 Hrithik Roshan Bollywood Hindi News Box Office Report

फक्त चार दिवसात क्रिश-3 ने केला 135 कोटींचा व्यवसाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडमध्ये असे मानले जाते की, दिवालीच्या आधी रिलीज होणा-या फिल्‍मला बॉक्‍स ऑफिसवर चांगला रिस्‍पॉन्‍स मिळत नाही. मात्र, क्रिश-3 ने ही धारणा चुकीची ठरविली आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या क्रिश-3 ने फक्त 4 दिवसात 100 करोड़ची मॅजिक फिगर पार केली आहे. तरण आदर्शच्या माहितीनुसार, शुक्रवार ते सोमवार या चार दिवसात क्रिश-3 ने भारतात 109 कोटीचा व्यवसाय केला आहे तर, इतर देशात सुमारे 25 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. त्यामुळे या चित्रपटाने एकून चार दिवसात सुमारे 135 कोटी रूपयांचा व्यवसाय केल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या चार दिवसात क्रिशने 135 कोटी रूपये कमविले आहे. त्यात पहिला दिवस धनतेरस, दूस-या दिवशी छोटी दिवाळी आणि तिस-या दिवशी लक्ष्मीपूजन म्हणजे मुख्य दिवाळी होती. क्रिश-3 ने भारतातच नव्हे तर परदेशातही चांगला गल्ला कमविला आहे. मात्र, दक्षिण भारतात या चित्रपटाला फारसा चांगला रेस्‍पॉन्‍स मिळाला नाही. मात्र, उत्तर भारत व विदेशात या फिल्मला प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले आहे.
पुढे वाचा विदेशात कोठे किती कमविले पैसे....