आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: असे होते प्राण यांचे खासगी आयुष्य, बघा PHOTOS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जंजीर' सिनेमामध्ये प्राण हे मस्तीभ-या अंदाजात 'यारी है ईमान मेरी, यार मेरी जिंदगी' हे गाणे गाताना दिसले होते. वास्तविक आयुष्यातदेखील ते असेच आनंदी आणि मनमोकळे आयुष्य जगत होते. बॉलिवूड जगात उत्कृष्ट खलनायक म्हणून ओळखले जाणारे प्राण पडद्यामागील आयुष्यात मात्र एखाद्या हीरोपेक्षा कमी नव्हते. 'यारे के यार प्राण' यांचा 12 जुलै 2013च्या रात्री मृत्यू झाला.
अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवणा-या प्राण यांनी 1940पासून 1996पर्यंतच्या अनेक सिनेमांत प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली. सुरूवातीला त्यांनी एका नायकाच्या भूमिकेत स्वत:ची ओळख निर्माण केली. परंतु 1947नंतर ते सर्वाधिक खलनायकाच्या भूमिका साकारताना दिसले. त्यांनी बॉलिवूड सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे बरेच मनोरंजन केले. भूमिका कशीही असो प्राण यांनी त्या भूमिकेत स्वत:चा प्राण ओतून ती साकारली.
2000मध्ये त्यांना 'स्टारडस्ट' मासिकाच्या वतीने 'विलेन ऑफ मिलेनियम'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारत सरकारने 2011मध्ये त्यांना पद्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2013मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सिनेमा प्रतिष्ठित सम्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राण आज आपल्यामध्ये नाहीत, पंरतु त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी त्यांची छायाचित्रे आपल्याकडे आहेत. जे त्यांच्या शानदार व्यक्तीमत्वाची आठवण आपल्याला करून देतात. त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला प्राण यांच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्राण यांच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे जे तुम्ही बघितलेली नाहीत.