आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या विक्रमाच्या वाटेवर ‘लाइफ ऑफ पाय’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकबॉलिवूडमध्ये आता चांगले सिनेमे येत नसल्याने आठवडाभरही सिनेमा थिएटरमध्ये टिकत नाहीत. त्यामुळे एखादा सिनेमा 100 दिवस चित्रपटगृहात झळकणे ही आता विशेष बाब बनली आहे. मात्र दिग्दर्शक आंग ली यांनी बनवलेला ‘लाइफ ऑफ पाय’ हा सिनेमा गेल्या 200 दिवसांपासून थिएटरमध्ये झळकत आहे. कोची येथील पीव्हीएस फिल्मसिटी या थिएटरमध्ये हा सिनेमा अजूनही दाखवला जात आहे. येथे सतत हाऊसफुल्ल राहत असल्याने हा सिनेमा नवीन विक्रम स्थापन करण्याच्या बेतात आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या सिनेमाने चार श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार तर मिळवला आहेच. शिवाय देश-विदेशात अनेक बिझनेस अवॉर्ड पटकावले आहेत.