आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Like To Accept Challenges In Life Says Anil Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आव्हाने स्वीकारायला नेहमीच आवडते : अनिल कपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी आव्हाने स्वीकारून त्यातून मार्ग काढायला नेहमीच आवडते, असे मत प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरने एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. 24 (ट्वेंटी फोर) नावाच्या शोमधून अनिल लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

अनिल म्हणाला, मला नेहमीच नवे प्रयोग करायला आवडतात. ज्या गोष्टींमध्ये कायम आव्हाने असतात त्याकडे माझा कल असतो. मग त्यातून काहीतरी वेगळे देण्याचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते.

प्रेक्षकांना आपल्या कामातून काहीतरी वेगळे देऊन त्यांचे मनोरंजन करणे सर्वात मोठे आव्हान आहे. टीव्ही असे माध्यम आहे, जे लोकांना आजही आवडते. तसेच त्यावरील कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. टीव्हीवर आलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे मी सर्वात प्रभावशाली माध्यमाचा भाग होत आहे, त्याचा मला अभिमान आहे. मालिकेत अनिल कपूर हा जयसिंग राठोडचे पात्र रंगवताना दिसणार आहे. यात मंदिरा बेदी, नील भोपालम, टिस्का चोप्रा, अनिता राज, अजिंक्य देव यांच्याही भूमिका आहेत. अनुपम खेर, शबाना आझमी आणि राहुल खन्ना पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या शोसाठी मी अनेकांना विचारणा केली. अनुपम आणि शबाना यांनी शोबाबत काहीही न विचारता माझ्या शब्दाखातर यात काम करण्यास संमती दिली हे विशेष.

पापा अनिल यांनी आजवर चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता छोट्या पडद्यावरील त्यांचे वेगळे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या वडिलांची प्रशंसा करताना सांगितले. दुसरी मुलगी रेहानेही वडिलांना त्यांच्या आगामी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तीन महिलांना महत्त्व
आजवर चित्रपटात मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. सर्व सहकारी अभिनेत्रींसोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, तरीदेखील माझ्या जीवनात पत्नी सुनीता, मुलगी सोनम आणि रेहा या कायम उच्चस्थानी आहेत. तिघींमुळे मला नेहमीच स्फूर्ती मिळते, असे अनिलने सांगितले.