आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Look Who Is Giving Competition To Katrina Kaif Kareena Kapoor

भाग मिल्खा भाग: बघा कोण देणारेय बेबो, कॅट आणि सोनमला टक्कर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.

सिनेमाच्या ट्रेलरला लोकांची पसंती मिळत आहे. याशिवाय हा सिनेमा चर्चत राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे या सिनेमातील अभिनेत्री रेबेका एलिजाबेथ ब्रीड्स. ऑस्ट्रेलियन वंशाची ही अभिनेत्री 'भाग मिल्खा भाग'द्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमातील रेबेका आणि फरहान अख्तरच्या किसींग सीनची जोरदार चर्चा रंगत आहे. विशेष म्हणेज फरहान अख्तरचा हा पहिलाच ऑन स्क्रिन किस आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये हा एक हॉट टॉपिक बनला आहे.

आता सिनेमा हिट होईल की नाही हे येणा-या दिवसांत कळेल. मात्र रेबेका बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यास सज्ज झालीय हे तर स्पष्ट आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रेबेका एलिझाबेथ ब्रीड्सची खास झलक...