आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाच नकारात्मक गोष्टींचा \'जय हो\'च्या कमाईवर होऊ शकतो परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' आज (24 जानेवारी) बॉक्स ऑफिसवर झळकला. 'वाँटेड' सिनेमानंतर त्याचे जवळपास सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिवर सुपरहिट झाले आहेत. 'दबंग', 'रेडी', 'बॉडीगार्ड', 'एक था टाइगर' आणि 'दबंग 2' या सिनेमांनी चांगली कमाई केली होती. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या ट्रेलरला लाँचनंतर चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता आणि सिनेमाचे म्यूझिकसुध्दा हवे तसे हिट होऊ शकले नाही. प्री-बुकिंगसुध्दा खूप कमी होती आणि सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळालेले नाहीये.
सलमानने सिनेमाचे संगीत आणि सॅटेलाइटचे अधिकार स्वत:जवळ ठेवले आहेत. सिनेमाचे संगीत आणि सॅटेलाइट हक्क जवळपास 60 कोटी रुपयांचे आहेत. निर्माता-दिग्दर्शक सोहेल खानला हा भव्य सिनेमा बनवण्यासाठी 60 कोटींचा खर्च आला आहे. सलमान आणि सोहेल यांनी इरोज इंटरनॅशल कंपनीला सर्व जगभरातील अधिकार 85 कोटींमध्ये विकले आहेत. इरोजला प्रिंट आणि प्रचारच्या खर्चासहित हा सिनेमा 110 कोटींमध्ये गेला आहे. भारतामध्ये सिनेमाचा 150 कोटींचा एकुण व्यवसाय झाला तर इरोज कंपनीचा सर्व खर्च निघू शकतो.
परंतु, सिनेमातील काही सीन्स बघितले तर वाटते, की त्या सीन्समुळे सलमानचा हा सिनेमा त्याच्या मागील सिनेमांसारखा सुपर-डुपर हिट होऊ शकणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सिनेमातील कमकुवत बाजू ज्या सिनेमाच्या यशासाठी ठरू शकतात अडथळा...