आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लुटेरा'ने बनवला रेकॉर्ड, रिलीजपूर्वीच झाले 15 स्क्रिनिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंह स्टारर 'लुटेरा' हा लव्ह-थ्रिलर सिनेमा 5 जुलै रोजी रिलीज झाला. या सिनेमाचे निर्माते बालाजी आणि फँटम फिल्म्सने या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी एक किंवा दोन नाही तर तब्बल 15 पेक्षा जास्त शो आयोजित केले होते.
खरं तर आत्तापर्यंत सिनेमाचं स्क्रिनिंग त्याच्या रिलीजच्या एक दिवसाआधी होतं. मात्र बॉलिवूडच्या एलीट क्लासबरोबरच मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबासाठी गेल्या सात दिवसांपासून या सिनेमाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले.
ही प्रेमकहाणी बघण्यासाठी बॉलिवूडमध्ये विशेष उत्साह दिसून आला. त्यामुळे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी या सिनेमाचे एवढे स्क्रिनिंग आयोजित करण्यासाठी परवानगी दिली.