आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: बॉलिवूडमधील गाजलेली प्रेमपाखरे, हळव्या आठवणींना उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडही याला अपवाद नाही. चित्रपटांमध्ये काम करताना काही हळवी मनं एकत्र येतात. काही काळ सुखात, आनंदात घालवतात. त्याची सर्वत्र धुमसत चर्चा होते. दोघांचे हळवे क्षण क्लिक केले जातात. वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनेल्सवरही मथळे झळकतात... परंतु, काहीतरी अघडीत घडतं. दोघं एकमेकांपासून दूरावतात. कमालीचं दुःख उराशी बाळवून जोडिदाराला निरोप देतात. आणि पुढील आयुष्य त्या आठवणींच्या शिदोरीवर काढलं जातं. त्यावर कधीही थर बसत नाही. त्या कायम जीवंत राहतात. कधीही उलगडून बघण्यासाठी... पावसाच्या सरी कोसळत असताना अशा आठवणींना नकळत उजाळा मिळतो. काळाच्या पडद्याआड जाऊन असे क्षण पुन्हा ताजेतवाने होतात. काही काळ जगून पुन्हा आठवणींच्या पेटाऱ्यात बसण्यासाठी...