आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच करणचा ‘द लंच बॉक्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकपहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये छोट्या नावाच्या बिगर व्यावसायिक चित्रपटांना मोठे निर्माते आणि दिग्दर्शक प्रदर्शित करत आहेत. किरण राव आणि आमिरने ‘शिप ऑफ थिसियस’ ला सपोर्ट केला, नंतर ‘बीए पास’ ला भरत शहाने आणि आता रितेश बत्राच्या ‘डब्बा द लंच बॉक्स’ चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी करण जोहर आणि यूटीव्ही पुढे आले आहेत.

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची आवड असणार्‍या प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले चित्रपट आता जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचत आहेत. बॉलिवूडमधील मोठे-मोठे लोक या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी पुढे येत आहेत. अलीकडेच आनंद गांधीच्या ‘शिप ऑफ थिसियस’ ला किरण राव आणि डिस्ने यूटीवीने प्रदर्शित केले. आता या चित्रपटाने तिसरा आठवडा गाठला आहे.

या आठवड्यात दिग्दर्शक अजय बहल यांच्या ‘बीए पास’ चित्रपटाला महोत्सवासाठी तयार करण्यात आलेला वासनांध चित्रपट मानण्यात येत होते. मात्र, महेश भट्ट आणि विशाल भारद्वाज यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकाने चित्रपटाचे कौतुक केले. निर्माते भरत शहा यांनी चित्रपटाला मदत केली. आता करण जोहरसुद्धा ‘डब्बा’ ला पुढच्या महिन्यात 20 तारखेला रिलीज करणार आहे. न्यूयॉक आणि मुंबईत राहणारा दिग्दर्शक रितेश बत्राचा हा पहिला चित्रपट आहे. भारतात हा चित्रपट रिलीज करताना खूप आनंद होतो आहे. कथानकावर मी खूप लक्ष दिले, इतक्या मोठ्या रिलीजची अपेक्षा नव्हती, असे रितेश यांनी सांगितले.