Home »Top Story» Madhubala's Glamarous Photoshoot For Life Magazine

PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 13:48 PM IST

सध्याच्या काळात अभिनेत्रींचे हॉट फोटोशूट बघणे तसे चाहत्यांसाठी नित्यनेमाचेच झाले आहे. मात्र 1940-60 या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांनीसुद्धा आपल्या काळात एक ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का ?
क्लासिक ब्यूटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मधुबाला यांनी लाईफ मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्यांनी एकाहून एक पोज दिले होते.
मधुबाला यांचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी 1951 साली केले होते.
मधुबाला यांनी महल (1949), मिस्टर अँड मिसेस 55 (1955), हावडा ब्रिज (1958), चलती का नाम गाडी (1958), मुगल-ए-आजम (1960), हाफ तिकट या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले.
आज मधुबाला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या या ग्लॅमरस फोटोशूटची खास झलक दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही खास छायाचित्रे...

फोटो साभार - लाईफ मॅगझिन

Next Article

Recommended