आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रामलीला’त माधुरी धरणार आयटम साँगवर ताल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमात ‘घागरा’गाण्यावर नृत्य सादर करून धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. यानंतर ती आता आणखी एका सिनेमात आयटम साँगवर ताल धरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘रामलीला’ या सिनेमात माधुरी एका गाण्यावर धमाल नृत्य सादर करताना दिसणार आहे. भन्साळी यांनी सिनेमात माधुरीचे गीत ठेवण्याची इच्छा प्रकट केली असून त्याचा मान ठेवत माधुरीनेही त्यांच्यासाठी नृत्यगीत करण्यास होकार दिला आहे. या गाण्याचे लवकरच चित्रीकरण होणार आहे. याआधी माधुरीने संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ सिनेमात चंद्रमुखीची भूमिका केली आहे.