आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीची कॉमेडी फिल्म करायची इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नृत्य आणि अभिनयातून लाखो लोकांची मने जिंकणारी माधुरी दीक्षित आता गंभीर भूमिका करून कंटाळली आहे. म्हणून ती आता विनोदी भूमिका करू इच्छित आहे. अलीकडेच तिने आपली ही इच्छा बोलून दाखविली. ती म्हणाली की, मी एकाच भूमिकेवर अडकून राहणार नाही तर मला विनोदी भूमिका करायला आवडेल. शिवाय मला खूप एक्सपेरीमेंट्ससुद्धा करायचे आहेत. मात्र मला कशा भूमिका मिळतात हे त्यावर ठरेल. खरं तर माधुरीच्या योग्यतेवर कोणालाच शंका नाही. ती कॉमेडीसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकते. सध्या माधुरी ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’मध्ये व्यग्र आहे.