आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमाकेदार आयटम नंबरवर थिरकणार 'धक-धक गर्ल'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. माधुरी करण जोहरच्या आगामी सिनेमात आयटम नंबरवर ताल धरणार आहे.

करण जोहरच्या आगामी 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत केला जाणार आहे. हा आयटम नंबर आजवरच्या इतिहासातील दमदार डान्स नंबर असल्याचा दावा करण जोहरने केला आहे.

हा डान्स नंबर करायला माधुरीनेही आपला होकार कळवला आहे. अद्याप हे आयटम नंबर जुन्या गाण्यांचे रिमिक्स असणार की, संपूर्णतः नवीन गाणे असणार हे निश्चित झालेले नाहीये.

'ये जवानी है दिवानी' या सिनेमात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मेन लीडमध्ये आहेत. या गाण्यात माधुरीबरोबर थिरकण्याची संधी मिळणार असल्यामुळे रणबीर खूपच एक्साईटेड आहे. हा आयटम नंबर फराह खान कोरिओग्राफ करणार आहे.

सो माधुरीचा हा आयटम नंबर बघण्यासाठी तिचे फॅन्स नक्कीच आतुर असणार नाही का.