आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madras Cafe Stunt Director Manohar Verma Attacked By Tinnu Verma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मद्रास कॅफे\'च्या स्टंट दिग्दर्शकावर तलवारीने हल्ला, छायाचित्रांमध्ये बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मद्रास कॅफे' या सिनेमाचे स्टंट दिग्दर्शक मनोहर वर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मद्रास कॅफे शुक्रवारी रिलीज झाला असून, वर्मा यांच्यावर त्यांचा सावत्र भाऊ टीनू वर्मा याने तलवारीने वार केले आहेत. यात मनोहर वर्मा गंभीर जखमी झाले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर आणि टीनू वर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरुन वाद सुरु होता. शुक्रवारी या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की टीनूने मालाड येथील फार्म हाऊसवर मनोहर वर्मा यांच्यावर तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात मनोहर वर्मा गंभीर जखमी झाले आहेत. मनोहर वर्मा यांच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. सुत्रांनी सांगितले, की काही तासांपूर्वीच त्यांच्या पायावर सर्जरी करण्यात आली. तब्बल सहा तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी त्यांच्या पायात मेटल रॉड टाकली आहे.

याप्रकरणी टीनू वर्माच्या विरोधात भां.द.वी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर टीनू वर्मा फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टीनू वर्मासुद्धा बॉलिवूडमध्ये स्टंट दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. 'घायल', 'खुदा गवाहसह अनेक सिनेमांतील अँक्शन सीन्स दिग्दर्शित केले आहेत.

पुढे क्लिक करुन बघा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या मनोहर वर्मांची छायाचित्रे...

(पुढील छायाचित्रे विचलित करणारी आहेत.)