आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Changes In Bollywood Actors Trends And Style In Last 100 Years

PHOTOS : गेल्या 100 वर्षांतील बॉलिवूड अ‍ॅक्टर्स, फॅटी ते सिक्स पॅक अ‍ॅब्सपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांच्या काळात बॉलिवूडने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. कमाईमध्ये बॉलिवूड जगभरात दुस-या स्थानावर आहे.

1913 साली दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. त्यानंतर 1931 साली आर्देशर ईराणी यांनी 'आलमआरा' हा पहिला बोलपट बनवला. खान बहादुर आर्देशर ईराणी यांनी 1937 साली पहिला रंगीन सिनेमा बनवला. त्याचे नाव होते 'किसान कन्या'. यानंतर हलते चित्र असलेल्या सिनेमांची लोकप्रियता भारतात प्रचंड वाढ झाली. सिनेमा सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना निर्मात्यांनी सिनेमांच्या तिकिटावरील किमतीवरही विशेष लक्ष दिले. असे सांगितले जाते की. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात बॉम्बे (आत्ताचे मुंबई) मध्ये दाखवल्या जाणा-या सिनेमांच्या तिकिटाची किंमत एक आणे (4 पैसे) इतकी होती.

गाणी, नृत्य, रोमान्सने परिपूर्ण असलेल्या 'मसाला सिनेमे' (भारतीय सिनेमांसाठी वापरात असलेला शब्द) दुस-या विश्वयुद्धानंतर बनवले जाऊ लागले. सोबतच सिनेमा बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला. कलाकारांची स्टाईल आणि अंदाजही बदलले.

काळ बदलला तसा कलाकारांचे रुपडेही पालटले. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडचे अभिनेते लठ्ठ होते. मात्र आत्ताच्या काळात बॉलिवूड अभिनेते आपल्या बॉडीकडे विशेष लक्ष देताना दिसतात.

आज आम्ही तुम्हाला या शंभर वर्षांत भारतीय अभिनेत्यांमधील बदलाबद्दल सांगतोय...