आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Fire Engulfs Gorton Castle Building In Shimla

‘थ्री इडियट्स’च्या चांचडचे घर आगीत भस्मसात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला - सिमल्याच्या मालरोड येथील अकाउंटंट जनरल ऑफिसची (एजी) ऐतिहासिक वास्तू मंगळवारी आगीत भस्मसात झाली. साधारण साडेतीन वाजता लागलेल्या आगीत इमारतीचे वरचे दोन मजले संपूर्ण जळाले. इमारतीमध्ये सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’ची दृश्ये चित्रीत करण्यात आली होती. गॉर्टन कॅसल नावाने प्रसिद्ध असलेल्या 108 वर्षे जुन्या या इमारतीचा 2003 मध्ये राष्ट्रीय वारसा वास्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला होता. चित्रपटात आमिर खानच्या शोधात दोन मित्र रणछोडदास चांचडच्या घरी जातात ते हे घर होते. यानंतर मित्रांना रणछोडदासची खरी माहिती कळते.
1905 मध्ये ब्रिटिश शासकांनी इमारत तयार केली होती. या आगीत 60 खोल्यांमध्ये ठेवलेले दस्तऐवज नष्ट झाले आहेत. या वास्तूला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बला 4.30 तासांचा कालावधी लागला.