आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Dinner With Family, Amrita Shakeel Also Join Couple: PICS

मलायकाने कुटुंबीयांसोबत केले डिनर, अमृता-शकीलसुध्दा दिसले सोबत, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची आयटम नंबर मलायका आरोरा खानला पती अरबाज खान आणि मुलगा अरहानसोबत मुंबईच्या एका हॉटेलमधून बाहेर येताना बघितले गेले. हे तिघेही मुंबईच्या बांद्रा परिसरातील हक्कासन हॉटेलमधून 10 वाजेच्या आसपास बाहेर पडताना दिसले. त्यावेळी त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा पती शकील लडकसोबत दिसली.
मलायकाने काळ्या रंगाची लेदर जीन्स आणि पांढ-या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. अरबाज निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. मुलगा अरहान निळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढ-या बॉक्सर आणि कॅपमध्ये खूपच कूल दिसत होता.
अमृता अरोरा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली आणि तिचा पती शकिलने निळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट घातलेला होता. ही जोडीसुध्दा मलायका आणि अरबाजसोबत डिनरसाठी आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अरबाज, मलायका, अमृता आणि शकीलची काही खास छायाचित्रे...