आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallaika Arrived In Disney Shows, Lots Of Fun With The Kids: PIX

PICS: डिन्जी शोमध्ये पोहोचली मलायका, मुलांसोबत केली धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची सर्वाधिक स्टाइलिश आई मलायका अरोरा खानने डिन्जी चॅनलसाठी एक कार्यक्रम शुट केला. या चॅनलवर येणा-या 'कॅप्टन टिया' या शोमध्ये दिसणार आहे. मलायका बॉलिवूडमध्ये एक आयटम नंबर आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. सोबतच, ती काही शोमध्ये दिसली आहे. आता दोन मुलांची आई मलायका डिन्जीच्या शोमध्ये मुलांसोबत मस्ती करताना दिसणार आहे.
मलायकाच्या या खास शोची शुटिंग महबूब स्टुडिओमध्ये केली आहे. त्यावेळी ती निळ्या रंगाच्या प्रिंटेड श़ॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरासुध्दा उपस्थित होती. ती तिच्या मुलांसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. तिने पांढ-या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता.
मलायकाने या कार्यक्रमात मुलांसोबत बरीच धमाल-मस्ती केली. त्यांनी मुलांना दुध पिण्याचे फायदे सांगितले. एका मुलासोबत तिने तर चक्क पुशअपसुध्दा केले. सोबतच तिने मुलांना मांजरीसारख्या काही प्राण्यांचे चित्रदेखील काढून दाखवले. मलायकाने काही मुलांसोबत डान्ससुध्दा केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मलायकने कशी मुलांसोबत धमाल-मस्ती केली...