आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat Not Comfertable To Do Bold Scens With Om Puri

मल्लिका घाबरली ‘बोल्ड सीन’ला ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अभिनेत्री मल्लिका शेरावत भंवरी देवीवर आधारित सिनेमाची शूटिंग करत आहे. या सिनेमात काही बोल्ड दृश्य असणार आहेत. मल्लिकाला अभिनेता ओमपुरीसोबत हे बोल्ड दृश्य करायचे आहेत.

मात्र या बोल्ड सीनमुळे मल्लिकाची घाबरगुंडी उडाली आहे. ती म्हणते की, ओमपुरी सारख्या मुरलेल्या कलावंतासोबत असले दृश्य देण्यास मला भीती वाटत आहे. हे सीन देतेवेळी सेटवर जास्त लोक नसले पाहिजेत, अशी तिने अट ठेवली आहे. आता ही अट तिने ओमपुरीमुळे ठेवली आहे की आपल्या आईमुळे, हे तिलाच माहीत. कारण सध्या सेटवर मल्लिकासोबत तिची आईसुद्धा येत आहे. आपल्या आईसमोर असे दृश्य करण्याचीही तिला भीती वाटत आहे. ती म्हणते की, ‘सेटवर माझ्यासोबत माझी आई येत आहे. ती 4-5 दिवस येथेच राहणार आहे. ती गेल्यावर या दृश्याची शूटिंग झाली तर बरे होईल, कारण त्यांच्यासमोर मी बोल्ड सीन देऊ शकणार नाही.’