आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat Ousted From Her International Film

मल्लिकाला स्वतःचा निष्काळजीपणा भोवला, हॉलिवूड सिनेमातून निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची सेक्स सिंबल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतला एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निर्मात्यांनी मल्लिकाच्या टॅन्ट्रम्स आणि अॅडिड्युडला कंटाळून तिला सिनेमाच्या बाहेर काढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिड डे च्या रिपोर्टनुसार, मल्लिका शेरावतला 'ए लिटिल हॅवेन इन मी' या हॉलिवूड सिनेमासाठी साईन करण्यात आले होते. हा सिनेमा बिबिया फिल्म्स ही अमेरिकन कंपनी प्रोड्युसर करत आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शक भारतीय वंशाचे केशव पनेरी असून ते कॅनेडात स्थायिक झाले आहेत. मल्लिका या सिनेमासाठी त्यांची पहिली पसंत होती. दिग्दर्शकांनीच तिची निवड सिनेमासाठी केली होती. मात्र तिच्या निष्काळजीपणाला कंटाळून निर्मात्यांनी तिला प्रोजेक्टमधून बाहेर केले.
बॉलिवूडची ही चर्चित अभिनेत्री दीर्घ काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी ती एका रिअॅलिटी शोमध्ये स्वतःच्या स्वंयवराचा घाट घालून प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र शो संपल्यानंतर ती लाइमलाइटपासून दूर गेली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयी बरंच काही...