आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराबरोबर थाटलाय ममता कुलकर्णीने संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली ममता कुलकर्णी सध्या कुठे आहे, हा प्रश्न आजही तिच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होतो. एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी टॉपलेस फोटोशूट देऊन चर्चेत आलेली ममता या मायानगरीतून गेल्या एका दशकापासून बेपत्ता आहे. असे म्हटले जाते की, बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडू लागल्यामुळे तिने सिनसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

ममता विक्की गोस्वामी नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडली होती. विक्की आंतरराष्ट्रीय ड्रग (अंमली पदार्थ) तस्कर होता. 1997 साली 11.5 टन मॅड्रेक्स (जवळजवळ 60 लाख डॉलर किंमतीचे) ची तस्करी करताना त्याला अटक झाली होती आणि दुबईच्या तुरुंगात तो जेरबंद होता.

'मुंबई मिरर'च्या मते, विक्की आता 52 वर्षांचा झाला असून 15 नोव्हेंबर 2012 रोजी त्याची दुबईच्या तुरुंगातून सुटका झाली होती. विक्कीच्या तुरुंगातील चांगल्या आचरणामुळे तुरुंग अधिका-यांनी त्याची आजीवन कारावासाची शिक्षा कमी केली होती. तुरुंगात असताना विक्कीने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन ममताबरोबर लग्न केले होते. विक्कीच्या गैरहजेरीत ममता त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय सांभाळत होती. या व्यवसायात दुबईतील नामांकित हॉटेलचाही समावेश आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की पत्नी ममताबरोबर सध्या नैरोबीमध्ये वास्तव्याला आहे.