आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: आता दाऊदबरोबर नव्हे, यांच्याबरोबर राहते मंदाकिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऐंशीच्या दशकात ग्लॅमरस रुपात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी आता खूप बदलली आहे. आज (30 जुलै) तिचा वाढदिवस आहे. खासगी आयुष्यात आलेल्या चढ-उतारानंतर मंदाकिनीने फिल्मी करिअरपासून सन्यास घेतला आणि लग्न करुन संसार थाटला. ब-याच वर्षांनी मंदाकिनी दुर्गा जसराज यांची मुलगी अवनीच्या लग्नात दिसली, तेव्हा तिला ओळखणे कठीण गेले होते.

या पार्टीत मंदाकिनी तिचा पती कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर आणि मुलगी राब्जेबरोबर आली होती. आपली सेक्स सिंबॉलची इमेज तोडत 43 वर्षीय मंदाकिनी आता फार वेगळी दिसते.

राजकपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये बरीच वर्षे आपला जलवा कायम ठेवला होता.

याच काळात मंदाकिनीचे नाव दाऊदसोबत जोडले गेले होते. त्यामुळेही ती अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र दाऊद पासून वेगळे होऊन मंदाकिनीने 1995 मध्ये काग्यूर रिनपोचे या बौद्ध भिख्खूसोबत लग्न केले. सध्या मंदाकिनी मुंबईमध्ये तिबेटीयन हर्बल सेंटर चालवित आहे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा मंदाकिनीची तिचा पती आणि मुलांबरोबरची खास छायाचित्रे...