आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कॅन्सर सर्जरीनंतर बघा कशी दिसतेय मनीषा कोईराला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मनीषा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर उपचारासाठी मनीषा अमेरिकेला गेली होती. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याकाळात मनीषा मीडियापासून दूर होती.
मनीषा आता मुंबईला परतली आहे. आजारातून बरे झाल्यानंतर अलीकडेच तिने मुंबईतील आपल्या राहत्या घरी एका महापूजेचे आयोजन केले होते. या पूजेत तिच्या घरची मंडळी आणि मोठे पंडित हजर होते.
यावेळी मनीषा बरी आणि फ्रेश दिसत होती. सिगारेट आणि दारुच्या व्यसनासाठी प्रसिद्ध असेलली ही अभिनेत्री आता हेल्श कॉन्शिअस झाली आहे. मनीषाच्या मते, आता तिला दुसरे आयुष्य लाभले आहे. त्यामुळे ती आता आपल्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेणार आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मनीषाची लेटेस्ट छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये मनीषा महापूजा करताना दिसत आहे. मनीषा आता बरी दिसत असली तरीदेखील तिने आपला पूर्वीचा चार्म गमावला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा मनीषा कोईरालाची लेटेस्ट छायाचित्रे...