आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्‍येष्‍ठ गायक मन्‍ना डे यांची प्रकृती गंभीर, रुग्‍णालयात दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना छातीत संसर्ग झाल्याने बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. संसर्ग वाढल्‍यामुळे त्‍यांची प्रकृती खालावली.

काही दिवसांपूर्वी मन्‍ना डे यांची प्रकृती चांगली होती. पत्नीच्‍या स्‍मृतिंना उजाळा देण्‍यासाठी ते काही गाणी रेकॉर्ड करणार होते. परंतु, अचानक त्‍यांची प्रकृती खालावली. मन्‍ना डे यांच्‍यावर त्‍यांच्‍या कल्‍याणनगर येथील निवासस्‍थानी उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.

गेल्या महिन्यात 1 मे रोजी त्यांचा वाढदिवस झाला. त्यावेळी घराच्या बाल्कनीत येवून त्यांनी चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केले आणि शुभेच्छांचा स्वीकार केला होता. त्याचदिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना प. बंगाल सरकारचा विशेष महा संगीत सन्मान प्रदान केला होता.

मन्ना डे यांना 2007 मध्‍ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आलेले आहे.