आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध गायक मन्ना डे कालवश, हिंदी सिनेसृष्टीच्या सूवर्णयुगाचा सूर हरपला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सिनेसृष्टीच्या सूवर्णयुगाचे साक्षीदार असलेले प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे गुरुवारी (24 ऑक्टोबर) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बंगळूरु येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षांचे होते.
गेल्या चार महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना छातीत जंतूसंसर्ग झाला होता. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुली शुरोमा आणि सुमिता आहेत. मन्ना डे यांच्या पत्नी सुलोचना यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.
मन्ना डे यांचा जन्म 1 मे 1919 रोजी कोलकात्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव प्रबोधचंद्र डे असे होते.