आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज कुमार यांना रुग्णालयातून मिळाली सुटी, आता प्रकृती उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना पित्ताशयावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सोमवारी (29 जुलै) कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाचे संचालक राम नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

मनोज कुमार यांच्या पित्ताशयाला सूज आल्याने 17 जुलै रोजी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर त्यांच्या वाढदिवशीच म्हणजे 24 जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास तासभर ही शस्त्रक्रिया चालली.

मनोज कुमार स्वत: हे अभिनेते तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांनी अनेक देशभक्तीपर सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे.
ते भारतकुमारही म्हणूनही ओळखले जातात. पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, शोर, वो कौन थी, क्रांती आणि दो बदन या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.