आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manoj Kumar Initiates Legal Action Against 'Om Shanti Om' Makers

मनोज कुमार पुन्हा एकदा शाहरुखवर नाराज, दाखल केला खटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फराह खान दिग्दर्शित 'ओम शांति ओम' हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांनी या सिनेमाचा निर्माता शाहरुख खानविरोधात पुन्हा एकदा खटला दाखल केला आहे.

सविस्तर बातमी अशी आहे की, 'ओम शांति ओम' हा सिनेमा अलीकडेच जपानमध्ये रिलीज करण्यात आला आहे. जपानमध्ये रिलीज करण्यात आलेल्या या सिनेमातून मनोज कुमार यांची खिल्ली उडवण्यात आलेले दृश्य वगळण्यात आलेले नाही. त्यामुळे मनोज कुमार यांनी नाराज होऊन शाहरुख खानच्या रेड चिलीज या प्रॉडक्शन कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

'ओम शांति ओम' हा सिनेमा 2007 साली बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. त्यावेळीसुद्धा सिनेमातील 'त्या' दृश्यावरुन मनोज कुमार आणि शाहरुख खान यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा वादाची पुनरावृत्ती झाली आहे.