आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी झाली मनोज कुमार यांच्यावर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहेत.

आज (24 जुलै) त्यांचा 76 वा वाढदिवस आहे. वाढदिवशीच त्यांच्यावर गॉल ब्लाडरची शस्त्रक्रिया करण्यात आली.
किडनी स्टोनबरोबर त्यांचे गॉल ब्लडर खराब झाले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तब्बल एक तास ही शस्त्रक्रिया चालली.

मनोज कुमार यांची प्रकृतीमुळे त्यांचे चाहतेही चिंतित होते. मनोज कुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे चाहते शुभेच्छा आणि भेटवस्तू त्यांच्या घरी पाठवत आहेत. सोबतच ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही करत आहेत.

हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, नील कमल, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

अभिनयाबरोबर मनोज कुमार यांनी देशभक्तिपर सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भारत कुमार आणि क्रांती कुमार ही नावं दिली.