आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यताला मिळाला डिस्चार्ज, दोन शस्त्रक्रिया करून काढला यकृतातील ट्युमर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तला गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. मान्यताच्या यकृतामध्ये ट्युमर असल्याने तिच्यावर 8 जानेवारीपासून मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी काही वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर तिला हॉस्पिटमध्ये दाखल करुन घेतले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून यकृतातील ट्युमर काढण्यात आला.
मान्यताची प्रकृती खालावल्याने संजय दत्तने पॅरोलची मागणी केली होती आणि ती मंजूरदेखील झाली होती. एवढेच नाही तर महिन्याभरात मान्यताची प्रकृती ठिक होऊ शकत नाही, असे सांगून संजयने पुन्हा एकदा पॅरोलची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. संजयच्या या अर्जामुळे बरीच खळबळ उडाली होती. परंतु त्याला पॅरोलची मुदत वाढवून मिळाली. गेल्या दीड महिन्यापासून संजय पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे.
मान्यताच्या प्रकृतीविषयी सांगायचे झाले तर, तिच्यावर पहिली शस्त्रक्रिया 11 जानेवारीला तर दुसरी 22 जानेवारीला झाली होती. त्यानंतर तिला डॉक्टरांनी जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला. मान्यतावर उपचार करणारे डॉक्टर अजय चौघुले यांनी सांगितले, 'यकृतात गाठ असल्याने मान्यता खूप अशक्त झाली आहे. तिला पुढील काही दिवपस माझ्याकडे नियमित तपासणी यावे लागणार आहे. मान्यता हॉस्पिटलमध्ये असताना संजयने तिची खूप काळजी घेतली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मान्यतावर उपचार करणा-या डॉक्टरांनी काय सांगितले...?