आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजूबाबा शिवाय मान्यता पडली एकटी, सोशल इवेंट्समध्ये दिसते काळजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत मंगळवारी (2 जुलै) आगामी 'पुलिसगिरी' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. के. एस. रविकुमार दिग्दर्शित या सिनेमात संजय दत्त आणि प्राची देसाई मेन लीडमध्ये आहेत.
सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजयने आपल्या या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले होते.
संजय दत्त तुरुंगात असल्यामुळे या सिनेमाचे प्रमोशनल इवेंट त्याच्या अनुपस्थितीत होत आहेत. मंगळवारी पार पडलेल्या या सिनेमाच्या स्क्रिनिंगला संजयव्यतिरिक्त सिनेमाची सगळी स्टारकास्ट हजर होती.
तुरुंगवास भोगत असलेला संजय दत्त या इवेंटमध्ये हजर नसला तरीदेखील त्याची पत्नी मान्यता दत्त शाहरान आणि इकरा या आपल्या दोन्ही मुलांसोबत या स्क्रिनिंगला आली होती.
स्क्रिनिंगवेळी क्लिक करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये मान्यताच्या चेह-यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. संजयची अनुपस्थिती मान्यताला प्रकर्षाने जाणवत होती. हा सिनेमा येत्या 5 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'पुलिसगिरीच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या मान्यताची छायाचित्रे..