आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयचा 'पुलिसगिरी' सिनेमा बघून ढसाढसा रडली मान्यता दत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसाठी 5 जुलै हा दिवस खूप खास आहे. कारण यादिवशी संजयचा 'पुलिसगिरी' हा सिनेमा रिलीज होत आहे. संजय तुरुंगात असल्यामुळे या सिनेमाच्या प्रमोशनची जबाबदारी त्याची पत्नी मान्यता दत्तने सांभाळली आहे. अलीकडेच मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजयचा सिनेमा बघितल्यानंतर मान्यताला अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडली. या सिनेमाचे निर्माते रोहित अग्रवाल यांच्या आग्रहानंतर मान्यता बुधवारी संजयची भेट घेण्यासाठी येरवडा तुरुंगात जाणार आहे. येथे ती तुरुंगातील इतर कैद्यांचीही भेट घेणार आहे.