आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, चित्रपट उद्योग आणि तथाकथित तज्ज्ञ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी इम्तियाज अली आणि साजिद नाडियादवाला यांचा ‘हायवे’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट 20 कोटींत तयार झाला. शिवाय प्रिंट आणि प्रचाराचा एकूण खर्च 30 कोटींच्या वर गेला. निर्मात्यांनी चित्रपटाची विक्री न करता संपूर्ण जोखीम स्वत: उचलली आहे. यूटीव्हीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला ए.आर. रहेमानने संगीत दिले आहे.
गेल्या आठवड्यात ‘गुंडे’ने पहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला, तर आठवड्याचा व्यवसाय 60 कोटींपर्यंत गेला. चित्रपटाचा भारतातील एकूण व्यवसाय 80 कोटी रुपये होणार असून त्यात ‘यशराज फिल्म्स’चा वाटा 40 कोटी असेल. पहिल्या दिवसाच्या व्यवसायावर एक नजर टाकली तर चित्रपटाचा व्यवसाय जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त होईल, असे चित्र आहे. अपेक्षेपेक्षा कमी व्यवसायाचे एकमेव कारण म्हणजे चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चित्रपटांचा व्यवसाय सामान्यापेक्षा 25 टक्क्यांनी कमी होतो. ही स्थिती गेल्या आठ दशकांपासून आहे. परीक्षांच्या या काळात तरुण वर्ग आणि कुटुंबांचे चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमीच असते. शेवटी कोणत्याही चित्रपटाच्या यशाचे मापदंड त्याच्या खर्चासमोर उत्पन्नाचे मापच असतात. यशराज फिल्म्सला आपल्या 45 कोटी गुंतवणुकीतून एकूण नफा 75 कोटी रुपये होईल.