आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Matarnity God Gift, Aishwarya Roy Expressed Herself

मातृत्व हा ईश्वराचा आशीर्वाद, ऐश्वर्या रॉयने व्यक्त केली भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मातृत्व हा दैवी आशीर्वाद असल्याची भावना बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने व्यक्त केली आहे.
जीवनामध्ये बदल हा ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येक बदलातून मिळणारा अनुभव हा आपल्याला अधिकाधिक विकास साधण्यासाठी आणि चांगली व्यक्ती बनण्यासाठी मदत करत असतो. त्याचप्रमाणे मातृत्व हा ईश्वराचा आशीर्वाद आहे. या अनोख्या भेटीने अत्यंत आनंदी असल्याची प्रतिक्रिया ऐश्वर्याने दिली आहे. अराध्या (ऐश्वर्याची मुलगी) हा आमच्या जीवनातील सर्वात बहुमोल आशीर्वाद आहे. ती आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. या अनुभवाने आपण भारावून गेल्याचे ऐश्वर्या म्हणाली. एका खासगी कार्यक्रमात ऐश्वर्या बोलत होती.


बिग बींचा वाढदिवस : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाबद्दल काहीही सांगण्यास ऐश्वर्याने नकार दिला. आमच्यासाठी ऑक्टोबरपासूनच घरात विविध उत्सवांना सुरुवात होते. नवरात्र, दसरा याप्रमाणेच या काळामध्ये आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे वाढदिवसही असतात. त्यामुळे या काळात आम्ही सगळेच कुटुंबीयांबरोबर आणखी जास्त व्यस्त असतो. त्यामुळे पप्पांचा (बिग बी) वाढदिवसासाठी उत्सुक असल्याचे ऐश्वर्याने यावेळी सांगितले.