आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीनाकुमारी कॉम्प्लेक्स व आपले मन...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील नटी म्हणते की, तिला मीनाकुमारी कॉम्प्लेक्स आहे. सुख आणि दु:ख यातील निवड करायची असल्यास दु:खाची निवड, आनंदाची संधी हातची गमावणे. दु:ख कवटाळणे, सर्वांना चोरून नशिबाला दोष देण्याची संधी हवी, हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. देवदासलाही हा कॉम्प्लेक्स होता, ममता बॅनर्जींनाही आहे. लोक म्हणतात की, कम्युनिस्टांना कंटाळून बंगालने यांना निवडून आणले, मग त्या सर्वांना तर नाही ना..? असेच असेल तर आपणा सर्वांनाच तो कॉम्प्लेक्स आहे, कारण आपल्या हाती योग्य लोकांना निवडण्याची संधी असनही आपण गुन्हेगार, भ्रष्टाचार्‍यांना निवडून देतो. अशाच आणखी काही सामान्य कॉम्प्लेक्सविषयी सांगताहेत कमलेश सिंह...
स्टीव्ह जॉब्ज कॉम्प्लेक्स : अ‍ॅपल कंपनीचे निर्माता स्टीव्ह एवढे महान होते की, त्यांच्या यशकथांनी जगाला प्रेरणा दिली. काही जण तर एवढे प्रेरित झाले की त्यांचे अनुकरण करत करतच ते त्यांच्यासारखेच होऊ लागले. काळ्या रंगाचा टर्टल नेक टी शर्ट वापरू लागले. स्वत:वर बंधने, कुटुंबावर बंधने, कार्यालयात बंधने आणि काम असे, ज्याचा कधी विचारही केला नव्हता. काय ठरवले आहे आणि काय नाही याची कुणाशीच चर्चा नाही. त्यांच्या त्यांच्या कल्पना तुम्ही साकार करा. मुलांना साधे खेळणेही शिकवू लागतात. सकाळी उगवलेल्या सूर्याचा रंग नारंगी नसेल तर निसर्गावरही ते ओरडतील की, जास्त लाल का झाला?
जॉर्ज बुश कॉम्प्लेक्स : बुश यांना तटस्थपणा आवडत नव्हता. यांनाही नाही. सर्वसाधारणपणे तुम्ही एक तर यांच्या बाजूने आहात किंवा त्यांच्या बाजूने. परंतु यांच्या बाजूने आहात, हे निश्चित करा. नाही तर तुम्ही यांचे शत्रू. तुम्हाला पाषाणयुगात पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू होते. उदाहरणच द्यायचे तर यांना मांसाहार आवडतो, तर तो तुम्हालाही आवडलाच पाहिजे. नाही तर तुम्ही यांच्यासाठी निव्वळ वांगे आहात. यांना वांगे आवडत नाही आणि तुम्हाला ते आवडते तर तुम्ही मग वांगेच निघालात. काय म्हणालात तुम्हालाही वांगे आवडत नाही? तर मग गळाभेट घ्या.