आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेरठच्या काही वकिलांनी 'जॉली एलएलबी' या सिनेमाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आहे. वकिलांची मागणी आहे की, 'जॉली एलएलबी'चे प्रदर्शन रद्द करावे. कारण या सिनेमात वकिलांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
शुक्रवारी हा सिनेमा देशभरात रिलीज करण्यात आला. या सिनेमात जगदीश त्यागी उर्फ 'जॉली एलएलबी' (अर्शद वारसी) एक स्ट्रगलिंग वकिलाच्या भूमिकेत आहे. तो मेरठचा रहिवाशी असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. न्यायाधिशाची भूमिका अभिनेते सौरभ शुक्ला असून ते सिनेमात जॉलीची खिल्ली उडवताना दिसतात. सिनेमात जॉलीने दाखल केलेल्या याचिकेत प्रॉसिक्यूशनला प्रॉस्टीट्युशन आणि अपीलला अॅप्पल लिहिले असते.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या वकिलांनी सिनेमातील हे संवाद आपत्तीजनक असल्याचे म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने वकिलांचे म्हणणे फेटाळले आहे. शिवाय त्यांना सिनेमाला मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून बघण्याचा सल्ला दिला आहे. कोर्टाने सांगितले की, जर वकिलांना हा सिनेमा आपत्तीजनक वाटत असेल तर त्यांनी सिनेमा बघू नये.
न्यायाधिश आर. एम. लोढा आणि मदन बी लोकुर यांच्या बेंचने या प्रकरणाबद्दल बोलताना म्हटले की, ''तुम्हाला सिनेमातील संवादांमुळे काय अडचण आहे ? आमच्या कोर्टातसुद्धा अनेक याचिकांमध्ये स्पेलिंगच्या चुका असतात. प्रत्यक्षात अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत, ज्यात याचिकेत अपीलला अॅप्पल आणि सेक्शन 171 ला सेक्शन 17 लिहिण्याच्या चुका केलेल्या आहेत. अशा चुका न्यायालयीन कामात अनेकदा बघायला मिळतात.''
'जॉली एलएलबी'च्या विरोधात याचिका करणारे वकिल चौधरी चरण सिंह मेरठच्या लॉ कॉलेजमधून लॉ ग्रॅज्युएट झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती.
सुप्रीम कोर्टातील न्यायाधिशांनी त्यांची याचिका फेटाळताना म्हटले की, 'जॉली एलएलबी' एक काल्पनिक पात्र आहे. त्यामुळे या प्रकरणाला धरुन ठेवणे योग्य नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.