आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार क्रिकेटर हरभजन सिंगने आता सिनेमांमध्ये आपला हात आजमावयाचे ठरवले आहे. हरभजन सिंगने कॉमेडी आणि रोमँटिक सिनेमे बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता अचानक हरभजनने हा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? यासाठी निमित्त ठरली आहे भज्जीची हॉट गर्लफ्रेंड गीता बसरा. हरभजन आणि गीताच्या अफेअरच्या बातम्या ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. हे दोघे सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र अद्याप या दोघांनीही आपल्या नात्याची कबूली दिलेली नाही. गीता बॉलिवूडची अभिनेत्री आहे. आगामी 'जिला गाजियाबाद' या सिनेमातील आयटम नंबरमुळे गीता सध्या चर्चेत आहे. याशिवाय अनेक कार्यक्रमात तिचे दर्शन घडत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात ती शक्ति कपूरबरोबर पोज देताना दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा भज्जीच्या हॉट गर्लफ्रेंडचा खास अंदाज...
गीताने स्वतः ही छायाचित्रे तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.