आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : भेटा तनुश्री दत्ताच्या धाकट्या बहिणीला, सिनेमात एकत्र झळकल्या आहेत दोघी बहिणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल तनुश्री दत्ताने अलीकडेच आपला 30वा वाढदिवस साजरा केला. 19 मार्च 1984 रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या तनुश्रीने 2004मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला होता. तनुश्री या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10पर्यंत पोहोचली होती. 'आशिक बनाया आपने' या सिनेमाद्वारे तिने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. मात्र तिची जादू फारशी चालू शकली नाही. त्यानंतर ती चॉकलेट, ढोल आणि सास बहू और सेन्सेक्स या सिनेमांमध्ये दिसली, मात्र हे सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.
तनुश्रीची बहीण आहे छोट्या पडद्यावरील चर्चित चेहरा...
तनुश्रीची धाकटी बहीण टीव्ही मालिकांमध्ये काम करत असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. एक घर बनाऊंगा या मालिकेत पूनम आकाश गर्ग ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिेनेत्री तनुश्रीची धाकटी बहीण इशिता दत्ता आहे.
सिनेमांत एकत्र झळकल्या आहेत दोघी बहिणी...
इशिताला अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळालेली नाहीये. मात्र कन्नड भाषेतील सिनेमात ती झळकली आहे. 'येनिदू मनासली' या सिनेमात इशिताने तिची थोरली बहीण तनुश्री दत्तासह स्क्रिन शेअर केली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तनुश्रीच्या धाकट्या बहिणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा इशिताचा खास अंदाज छायाचित्रांमध्ये...