मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी अहाना देओलच्या लग्नाची विशेष चर्चा रंगत आहे. अहानाचे लग्न दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमन वैभव वोरासह झाले आहे. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने दोनदा रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एक रिसेप्शन मुंबईत तर दुसरे दिल्लीत झाले.
तसं पाहता बी टाऊनमधील एखाद्या कुटुंबातील मुलीचे बिझनेसमनशी होणारे हे पहिले लग्न नाहीये. यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठित घराण्यातील मुलींची लग्न प्रसिद्ध उद्योगपतींशी झाली आहेत. या यादीत बच्चन घराण्यापासून ते कपूर आणि देओल घराण्याचा समावेश आहे.
एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या स्टारचे किंवा स्टार मुलांची लग्नं बी टाऊनमधीलच एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीशी होत होते. मात्र आता हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता फिल्मी तारे-तारका आपल्या मुलींच्या लग्नासाठी बिझनेसमनला प्राधान्य देताना दिसत आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीतील अशाच काही जोड्यांची ओळख करुन देतोय, जेथे मुलगी फिल्मी कुटुंबातील तर मुलगा व्यावसायिक आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन भेटा बच्चन, कपूर आणि देओल कुटंबातील बिझनेसमेन जावयांना...