आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुस-या मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवला येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या महोत्सवात दादासाहेब फाळके यांचा 1913 साली रिलीज झालेला 'राजा हरिश्चंद्र' हा सिनेमा दाखविला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या महोत्सवता दादासाहेब फाळके यांना मानवंदना दिली जाणार आहे. या चित्रपट महोत्सवाला भारतीय प्रेक्षक आणि येथील स्थानिक जनतेतून मोठी लोकप्रियता मिळत आहे.
या चित्रपट महोत्सवात दिवंगत निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यांचा विशेष गौरव म्हणून त्यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्डही दिला जाणार आहे. यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा हा पुरस्कार स्वीकारणार आहे. अमिताभ बच्चन यांनाही 'इंटरनॅशनल स्क्रीन आयकॉन' पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याने महोत्सवाची शानदार सांगता होईल.
मेलबर्न चित्रपट महोत्सवात एकूण 60 भारतीय चित्रपट पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे.
यंदाच्या महोत्सवात अमिताभ बच्चन विशेष आणि शॉर्टफिल्म स्पर्धाही होणार आहेत. स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडमधील स्पर्धकही सहभागी होतील. शिवाय बॉलिवूड डान्स कॉम्पिटिशनही येथे होणार आहे.
विद्या बालन, प्रभूदेवा, सिमी गरेवाल, फराह खान आणि कबीर खान या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.