आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mere Dad Ki Maruti Girl Rhea Chakraborty Molested

अज्ञात व्यक्तीकडून बॉलिवूड अभिनेत्रीची छेडछाड, दोन वॉचमॅनसमोर घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छेडछाडीच्या घटनेमुळे बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एमटीव्हीची माजी व्हिडियो जॉकी आणि गेल्या वर्षी यशराजच्या ‘मेरे डॅड की मारुती’मध्ये काम केलेली रिया चक्रवर्ती मंगळवारी म्हणजे होळीच्या दिवशी छेडछाडीची शिकार बनली. तिने आपल्या ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये रियाने तक्रार दाखल केली आहे.
ट्विटरवरुन व्यक्त केले दुःख -
रियाने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले, ‘माझी काही वेळापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने छेड काढली. तो माणूस दिसायला सभ्य वाटत होता. तो भरदुपारी माझ्या इमारतीच्या दोन वॉचमनच्या समोरून चालत आला. एक मुलगी आपल्याच इमारतीमध्ये सायंकाळी 5 वाजता सुरक्षितपणे येऊ शकत नाही का? मुंबईत असुरक्षित आहे.’
रोहन सिप्पीच्या ‘सोनाली केबल’ या आगामी चित्रपटात काम करत असलेल्या रिया चक्रवर्तीने जाहीर केले की, मुंबई महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही. शिवाय ती या भारतातील पुरुषांवर अत्यंत नाराज आहे. या प्रकरणाची माहिती तिने पोलिसांना दिली असून खार पोलिसांकडून तिला सहकार्यदेखील मिळाले आहे.
रियाची खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...