आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS :बर्थ-डेला तरुणींच्या गराड्यात असलेल्या मिकाने केली नाही चुकीची पुनरावृत्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिकाने मुंबईत एक जंगी पार्टी आयोजित केली होती. मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील त्याची मित्रमंडळी आली होती. सगळ्यांनी मिकाची पार्टी मस्त एन्जॉय केली.
मिकाच्या यंदाच्या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी कोणताही वाद निर्माण झाला नाही. काही वर्षांपूर्वी मिकाच्या बर्थ डे पार्टीतच राखी सावंतने मोठा गोंधळ निर्माण केला होता. मिकाने मस्तीत राखीला सगळ्यांसमोर किस केले होते. त्यामुळे राखी चांगलीच संतापली होती. मात्र यावर्षी असे काहीही घडले नाही.
मिकाने देसी बॉईज, तनु वेड्स मनू, राऊडी राठौर, जब वुई मेटसह अनेक सिनेमांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा मिकाच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...