आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milkha Singh Took Only 1 Rupee From Omprakash Mehra

मिल्खासिंगने घेतला फक्त एक रुपया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात 80 पैकी 77 धावण्याच्या स्पर्धा जिंकणार्‍या ‘फ्लाइंग शीख’ मिल्खासिंग यांनी आपल्या कथेचे हक्क दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांना केवळ 1 रुपयाला विकले आहेत. त्यांच्या या कथेवर चार मोठे दिग्दर्शक चित्रपट काढू इच्छित होते. मात्र मेहरा यांनाच या कहाणीचे हक्क मिळाले.

मिल्खासिंग यांचा मुलगा गोल्फ खेळाडू जीव मिल्खासिंग राकेश यांच्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटाने खूप प्रभावित झाला आहे. त्यामुळे मुलाने राकेश यांच्यासाठी गळ टाकल्यामुळे त्याच्या वडिलांनी राकेश यांना चित्रपटासाठी ही कहाणी देण्याचे ठरवले. एवढेच नव्हे तर मुलाच्या शब्दाचा मान ठेवत त्यांनी कथेचा हक्क अवघ्या एका रुपयात त्यांना विकले. पटकथा लिखाणावेळी मिल्खा यांनी दिग्दर्शक राकेश मेहरा व लेखक प्रसून जोशी यांच्यासोबत आपल्या जीवनाचे अनेक अंतरंग उलगडले. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून होणार्‍या नफ्याचा 25 टक्के हिस्सा मिल्खा यांना प्रॉडक्शन कंपनी देणार आहे.

मात्र हा निधीदेखील आपल्या ट्रस्टला देण्याची मिल्खा यांनी घोषणा केली आहे. चित्रपटाच्या पटकथेसाठी कमी मानधन घेणारे लेखक कमी असतील. मात्र बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार बर्‍याच वेळा सामाजिक कार्यासाठी मानधनावर पाणी सोडतात. पाच वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनीही एका चित्रपटासाठी एक कोटी एक लाख एवढे मानधन घेतले होते. त्यातील केवळ एक लाख रुपये ठेवून त्यांनी 1 कोटी सामाजिक संस्थांना वाटून दिले होते.