आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mishti's First Film Is With Me, Not Subhash Ghai

नवीन हिरोइनमुळे सुभाष घईंचा सिनेमा रिलीजपूर्वीच अडकला वादात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष घई यांची नवी हिरोइन न्यूकमर नसल्याची चर्चा आहे. या आधी एका सिनेमात तिने काम केल्याचा आरोप सहकलाकाराने केला आहे.

निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘कांची’ सिनेमातील मिष्ठी या भूमिकेसाठी एका नव्या चेहर्‍याला घेतल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, त्यांनी या सिनेमातून हिरोइन इंद्राणी चक्रवर्तीला लाँच केले आहे. मात्र, इंद्राणी न्यूकमर नसल्याचा आरोप बंगाली सुपरस्टार प्रोसेनजित यांनी केला आहे.

प्रोसेनजित यांचे म्हणणे आहे की, त्यांनी इंद्राणीसोबत रूपाली गुहा दिग्दर्शित सिनेमा नुकताच पूर्ण केला आहे. मग सुभाष घई तिला न्यूकमर का म्हणत आहेत ? ते म्हणाले की, इंद्राणी खूपच टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिला सुभाष घईंसारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम मिळाल्याने आम्हीसुद्धा खूप खुश आहोत. मात्र, ती न्यूकमर नाही. तिने आधीच एका सिनेमात काम केले आहे. त्यामुळे तिला न्यूकमर म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मी तिच्यासोबत ‘पोरिचोई’मध्ये काम केले आहे. अलीकडेच या सिनेमाचे चित्रीकरण आम्ही संपवले आहे. सिनेमात मी वडील आणि इंद्राणी मुलीच्या भूमिकेत आहोत. एखाद्या कलावंताला दुसर्‍यांदा लाँच करणे माझ्या समजण्यापलीकडे आहे.